लखनऊ – उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा करोनाची लागण झाली आहे. ते सध्या विलगीकरणात असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी स्वतः ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी ५ एप्रिल रोजी करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला होता. यानंतर आज त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये म्हंटले कि, प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर मी करोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करत आहे. योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्हर्च्युअल माध्यमातून आपण सर्व कामे करत असल्याचे सांगितले आहे.
तसेच, योगी आदित्यनाथ यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रदेश सरकार की सभी गतिविधियां सामान्य रूप से संचालित हो रही हैं।
इस बीच जो लोग भी मेरे संपर्क में आएं हैं वह अपनी जांच अवश्य करा लें और एहतियात बरतें।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 14, 2021
दरम्यान, उत्तरप्रदेशात एकाच दिवशी दोन मोठ्या नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासह समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना करोनाची लागण झाली आहे.
अभी-अभी मेरी कोरोना टेस्ट की रिपोर्ट पॉज़िटिव आई है। मैंने अपने आपको सबसे अलग कर लिया है व घर पर ही उपचार शुरू हो गया है।
पिछले कुछ दिनों में जो लोग मेरे संपर्क में आये हैं, उन सबसे विनम्र आग्रह है कि वो भी जाँच करा लें। उन सभी से कुछ दिनों तक आइसोलेशन में रहने की विनती भी है।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 14, 2021