पुणे – हॉटेल व्यवसायीक असलेल्या पतीने वेगळ्या रहात असलेल्या पत्नीला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून बलात्कार केला. यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी देत तु सर्व केसेस मागे घे, तु जर माझ्या आड आलीस तर तुला संपवून टाकीन अशी धमकी दिली. पत्नीला पुणे, टेम्भुर्णे आणी इंदापूर येथील हॉटेलमध्ये डांबून ठेऊन अत्याचार केले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा हा दुसरा विवाह आहे. आकाश बलभिम लोंढे(रा.टेम्भुर्णे, करमाळा रस्ता, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. विवाह झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काही वाद झाल्याने ते वेगळे रहात होते. यादरम्यान, फिर्यादी महिलेने पतीविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. इंदापूर येथे त्यांच्यात डिर्व्होर्सचा दावा सुरु आहे.
पतीने तीला 8 जानेवारी रोजी रिव्हाल्वरचा धाक दाखवत गाडीत बसवून वडगाव ब्रुदुक येथील हॉटेल विश्वासमध्ये नेले. तेथे पुन्हा रिव्हाल्वरचा धाक दाखत माझ्या आड येऊ नको तुला संपवून टाकीन अशी धमकी दिली.
यानंतर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. यानंतर तीला पुन्हा गाडीत बसवत घरगुती सामान घेऊन देण्याचा बहाणा करत टेम्भुर्णे येथील हॉटेलमध्ये नेऊन धाक दाखवत अत्याचार केले. या घटनेमुळे फिर्यादीची मानसिक परिस्थिती बिघडल्याने तीच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर तीने तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे करत आहेत.