रेसिपी : असा बनवा झटपट नाचणीचा डोसा

नाचणीचा (Ragi) डोसा ही एक पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी आहे. नाचणीच्या पिठाच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांमध्येच झटपट डोसे तयार करू शकता.   चला तर आपण जाणून घेऊया याची पाककृती

महत्त्वाची सामग्री

1 कप नाचणी पीठ , 1 मध्यम कांदा 1/2 कप कोथिंबीरीची पाने , २ ते ३ कढीपत्ता , ३ हिरव्या मिरच्या ,  चवीनुसार  मीठ , आवश्यकतेनुसार पाणी

बाउलमध्ये नाचणीचे पीठ व पाणी एकत्र घ्या

एका बाउलमध्ये नाचणीचं पीठ घ्या. पिठात पाणी घाला आणि नीट मिक्स करा. पिठामध्ये गाठी तयार होऊ नये, यासाठी सामग्री ढवळत राहा. डोशाचं बॅटर पातळ राहील, याची काळजी घ्यावी.

डोशाचे पीठ तयार करून घ्या

आता पिठामध्ये बारीक चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालावे. सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर  डोसे तयार करून घ्या गॅसच्या मध्यम आचेवर पॅन गरम करत ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर डोशाचे मिश्रण चमच्याच्या मदतीने पसरवा. डोसा पातळ करावा. डोशावर तेल किंवा तूप सोडा. दोन्ही बाजूंनी तीन ते चार मिनिटांसाठी डोसा शिजवून घ्या. तयार झाला आहे नाचणीचा डोसा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.