कोल्हापूर – पालकमंत्र्यांच्या विरोधात घरफाळात भ्रष्टाचार केल्याचे अनेक पुरावे असल्यामुळे माझ्या स्वतः च्या जीवितास धोका असल्याची माहिती महाडिक गटाचे नेते सुनील कदम आणि नाना कदम यांनी दिली आहे. ते कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. घरफाळा घोटाळ्याचे ठोस पुरावे दिलेत आता 15 कोटी रुपयांचा घरफळा कधी भरणार, हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे असेही ते म्हणाले.
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून अनेक मिळकती भाड्याने घेतल्या. मात्र त्याचा कोट्यवधी रुपयांचा घरफाळा हा चुकवला आहे. त्यामुळे आम्ही वारंवार यासंदर्भात आवाज उठवत असून प्रशासनालाही घरफाळा वसुली करा याबाबत निवेदन दिले आहे. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान सतेज पाटील यांनी घरफाळा बुडवण्याचे ठोस पुरावे दिले आहेत.
आता 15 कोटी रुपयांचा घरफाळा कधी भरणार हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं असे सांगत त्यांनी महाडिक गटाच्या नेत्यांना नेत्यांच्या जीवितास धोका असल्याचा आरोप देखील सुनील कदम यांनी केला आहे. याबाबत लवकरच आपण कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉक्टर शैलेश बलकवडे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.