प्रभात ऑनलाइन – हल्ली बहुतेक लोक सोशल मीडियावर लाइव्ह असतात. आपण बर्याच लोकप्रिय सोशल मीडिया खात्यावर स्वतःचे खाते तयार करतो. या प्लॅटफॉर्मद्वारे फेसबुक, यूट्यूब इत्यादीद्वारे देखील मनोरंजन करतो. लोक यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातूनही पैसे कमवतात.
तुम्हालाही या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे भरपूर पैसे कमवायचे असतील तर फेसबुक तुम्हाला एक छान संधी देणार आहे. ज्याद्वारे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही आपले व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवू शकता. अलीकडेच फेसबुक इंकने म्हटले आहे की ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कन्टेन्ट क्रिएटर्सना जाहिरातींद्वारे शॉर्ट-फॉर्म व्हिडिओपासून कमाई करण्यास परवानगी देईल.
-
फेसबुकने ब्लॉगच्या माध्यमातून याची घोषणा केली. कंपनीने सांगितले की फेसबुक आता कन्टेन्ट क्रिएटर्सना अधिक पैसे कमविण्यासाठी मदत करेल. जिथे निर्माते लहान व्हिडिओ बनवून जाहिरातींद्वारे पैसे कमवू शकतील. यासह, लोक फेसबुकवर आणखी कोणत्या माध्यमातून पैसे कमवू शकतात, याबद्दल देखील ब्लॉगमध्ये नमूद केले आहे.
-
फेसबुकवर, वापरकर्ते एका मिनिटापर्यंत कालावधी असलेले व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतात. ते जाहिरातींद्वारे कमाई करतील. आपल्या अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये 30 सेकंदाची जाहिरात प्ले केली तर आपल्याला पैसे दिले जातील. त्याच वेळी, तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडिओने सुमारे 45 सेकंदांची जाहिरात दर्शविली पाहिजे. यापूर्वी व्हिडिओंवर केवळ 3 मिनिटे किंवा त्याहून अधिक पैसे कमविण्याचा पर्याय होता. 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एक मिनिटापूर्वी कोणत्याही जाहिराती दाखविल्या जात नसत.
-
फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करुन जाहिरातींद्वारे पैसे कमावण्यासाठी आपल्याला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. आपल्या व्हिडिओमध्ये 60 दिवसांमध्ये 6 लाख व्हिव्हज असले पाहिजेत. दुसरीकडे, आपण लाईव्ह व्हिडिओ बनविला तर तो 60,000 मिनिटे पाहिला गेला पाहिजे. फेसबुक आधीपासूनच आपल्या कंपनी इंस्टाग्रामवर व्हिडिओंच्या दरम्यान जाहिराती दाखवत आहे.
-
तसे तर आपण यु ट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून देखील पैसे कमवू शकता. मात्र काही रिपोर्टनुसार, युट्यूबपेक्षा तुम्ही फेसबुकवर जास्त पैसे कमवू शकता. यु ट्यूबवर जेव्हा आपण व्हिडिओच्या मध्यभागी एक जाहिरात पाहता, तेव्हा काही सेकंदानंतर त्यामध्ये तो वगळण्याचा पर्याय येतो. अशा परिस्थितीत, वापरकर्ते ती जाहिरात वगळू शकतात. त्याच वेळी, फेसबुकच्या शॉर्ट व्हिडिओंमध्ये वगळण्याचा पर्याय खूपच कमी आहे, म्हणजेच वापरकर्त्यास संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जाहिरात पहावी लागेल.
-
अशा परिस्थितीत आपण फेसबुक व्हिडिओंद्वारे अधिक पैसे कमवू शकता. गुगलने यूट्यूबसाठी एक नवीन नियम आणला आहे की कन्टेन्ट क्रिएटर्सना यूट्यूबच्या माध्यमातून मिळणार्या कमाईतून कर भरावा लागेल. हा नवीन नियम यावर्षी जूनपासून अंमलात येईल.