नगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सोमवारपासून जिल्ह्यात लसीकरण सुरू केले आहे.गेल्या तीन दिवसांत 18 हजार 635 जणांनी करोना लसीचे डोस घेतले आहेत.
जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून, दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत आहे. जिल्ह्यात सरासरी दररोज तीनशे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका हद्दीत कोविड लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर, जिल्ह्यात 31 खासगी रुग्णालयात लस देणे सुरू आहे.
जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध झाली आहे.
साठ वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्ती आणि 45 ते 59 वय असणार्यांना व्यक्तींनाही लस दिली जात आहे. उच्च रक्तदाब, किडनी विकार, मधुमेह असे विविध आजार असणार्या व्यक्तींना वैद्यकीय असल्यानुसार कोविड लस दिली जात आहे.
जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये तीन दिवसांत 22 हजार 660 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी 18 हजार 635 जणांनी लस घेतली. जास्ती जास्त नागरिकांनी लस घेण्यासाठी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांनी केले.
नागरिकांनी नि:संकोचपणे लस घ्यावी. लस घेतल्यानंतर काही जणांना किरकोळ थंडी, ताप, डोकेदुखी असा त्रास जाणवतो. त्याकरिता आरोग्य विभागाकडून औषधे दिली जात आहेत. त्यामुळे जास्ती जास्त नागरिकांनी लस घ्यावी.
– डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्यचिकित्सक