कोल्हापूर – कोंबड्याच्या मूर्तीची चक्क पूजा करणारे गाव महाराष्ट्रात आहे. महाशिवरात्रीला कोंबड्याची पूजा करणारे वडणगे हे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. कोल्हापूरपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडणगे गावात दरवर्षी महाशिवरात्री दिवशी मोठी यात्रा भरत असते. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली आहे. ‘करवीर माहात्म्य’ या ग्रंथामध्ये वडणगे गावाचा ‘करवीर काशी’ असा उल्लेख आढळतो. आजही मंदिर परिसरात प्राचीन दगडी अवशेष पाहायला मिळतात.
महाशिवरात्रीला कोंबड्याची पूजा करणारे कोल्हापुरातले अनोखे गावशंकर पार्वतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडणगेला धार्मिक परंपरा आहे. दोन दिवस गावात यात्रा भरत असते. आहे. विशेष म्हणजे गावात शंकर आणि पार्वतीची दोन वेगवेगळी मंदिरे आहेत.
दररोज कोंबड्याला पुजणाऱ्या वडणगे गावचाची एक आख्यायिका आहे. जेव्हा शंकर-पार्वती करवीर भ्रमणासाठी गावात आले होते. तेव्हा तिसरा प्रहर झाल्याने कोंबडा आरवला. त्यामुळे गावाचा ‘करवीर काशी’ असा उल्लेख आढळतो. प्राचीन ग्रंथातसुद्धा असा उल्लेख असल्याचे गावकरी सांगतात. त्यामुळे महाशिवरात्री दिवशी गावात असलेल्या कोंबड्याच्या मूर्तीची पूजा करण्यात येते.
महाशिवरात्री यात्रे निमित्त या गावात कोल्हापुरसह इतर शहरांमधूनही भाविक दर्शनासाठी येत असतात. पहाटे गावकऱ्यांच्यावतीने मंदिरात अभिषेक करण्यात येतो. या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आज महाशिवरात्री निमित्ताने सकाळपासून धार्मिक विधी पार पडले.
शिवपार्वती मंदिराइतकेच गावातील तलावाला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा असल्याचे म्हटले जाते. जवळपास 32 एकरमध्ये पसरलेला भव्य असा गावात तलाव आहे. त्याला संबकेश्वर तलाव असे नाव आहे. अलीकडच्या काळात हा शिव पार्वती तलाव म्हणून परिचित झाला आहे. प्राचीन काळी संबकेश येथील गौतमी राजानेसुद्धा या गावात काही काळ वास्तव्य केले असल्याचे म्हटले जाते. त्याच काळात या तलावाचे काम झाल्याचे म्हटले जाते, अशी गावातील तरुण प्रवचनकार अभिजित नांगरे महाराज यांनी माहिती दिली आहे.