पुणे – खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होता. मयुर दत्तात्रय पोळ (रा.जांभुळवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी पोळ हा भोर येथील बाजारवाडी येथे लपला असल्याची खबर पोलीस अंमलदार राहुल तांबे व सचिन पवार यांना मिळाली होती. त्यानूसार गुन्हयाचे तपासी अंमलदार वैभव गायकवाड यांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रिंवंद्र भोसले, संतोष भापकर, सर्फराज देशमुख व अभिजित जाधव यांच्या पथकाने केली.