सलग तिसऱ्या दिवशी आढळले चारशेहून अधिक रुग्ण; 233 जणांना डिस्चार्ज : एकाचा मृत्यू
पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज आणखी 414 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर आज 233 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज बाधित झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 71 रुग्ण हे ड प्रभागामधील आहेत. आजपर्यंत 1 लाख 4 हजार 911 इतक्या जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 408 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 8 जणांना करोनाची लागण झाली. तसेच आज दिवसभरात शहरातील सांगवी येथील 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1837 तर शहराबाहेरील 772 इतक्या रुग्णांचा समावेश आहे. आज शहरातील ड प्रभागामध्ये सर्वाधिक 71 रुग्णांची नोंद झाली.
तर त्याखालोखाल ब प्रभागामद्ये 67 तर सर्वात कमी ग प्रभागामध्ये 27 रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरामद्ये 233 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 99 हजार 743 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2277 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 875 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 833 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात 2498 रुग्ण आहेत. एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या 3331 आहे.
जिल्हा रुग्णालयात 11 जणांची प्रकृती चिंताजनक
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात 24 करोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. त्यातील 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात नव्याने 2 करोनाबाधित रुग्णांची भर पडली. करोनाबाधितांमध्ये जुनी सांगवी आणि नवी सांगवी येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये एक पुरूष आणि एक महिला रुग्ण आहे. रुग्णालयातून करोनामुक्त झालेल्या 57 वर्षीय पुरुष रुग्णाला घरी सोडण्यात आले. तळेगाव दाभाडे येथील ते रहिवाशी आहेत. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 787 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, एकूण 172 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 688 जणांना होम क्वॉरंटाइन केले आहे.