पुणे – खडकवासला प्रकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे दीड टीएमसी इतका जादा पाणीसाठा आहे. त्यामुळे योग्य नियोजन केले, तर उन्हाळ्यात पाणीटंचाई अथवा पाणीकपातीची वेळ येणार नाही. सध्यस्थितीत खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांत 73.78% म्हणजे 21.51 टीएमसी पाणी उपलब्ध आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्याने धरणे भरली. त्यानंतर परतीच्या पावसाने सुध्दाही चांगली हजेरी लावल्याने धरणात चांगला पाणीसाठा झाला.
खडकवासला प्रकल्पातून पुणे शहरासह हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यांतील शेतीला पाणी कालव्यातून सोडण्यात येते. त्यामुळे प्रकल्पाकडे शहरासह ग्रामीण भागाचे लक्ष असते. मागीलवर्षी आजच्या दिवशी खडकवासला प्रकल्पात 20.07 टीएमसी पाणीसाठा होता.
प्रकल्प आणि पाणीसाठा (टीएमसी)
टेमघर – 0.52
वरसगाव- 9.66
पानशेत-10.02
खडकवासला- 1.31