-->

कॅन्टोन्मेंट हद्दीतही पालिकेचा कचरा प्रकल्प

जागा वापरासाठी मोजाणार 7.39 कोटी रुपये; स्थायी समितीची मंजुरी

 

पुणे – कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी पुणे कॅन्टोन्मेंटच्या जागा वापरा बदलात त्यांना 7.39 कोटी रुपये देण्याला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी याविषयी माहिती दिली.

कचरा प्रक्रियेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. उरळी देवाची येथील कचरा प्रकल्पामध्ये डंपिंग बंद केल्यानंतर महापालिकेला अन्य पर्याय शोधावे लागत आहेत. महापालिकेने काही ठिकाणी छोटे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. मात्र, रोजचा निर्माण होणारा सुमारे दोन हजार टन कचरा प्रक्रिया करणे हे मोठे चॅलेंज महापालिकेपुढे आहे.

त्यासाठी महापालिकेने हडपसर इंडस्ट्रीयल येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 50 टन कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये कचरा प्रक्रियेची मागणी केली होती. बोर्डाने ती मंजूर केली. मात्र, कचरा डंपिंगसाठी महापालिकेला 402 रुपये प्रती टन प्रती दिवस द्यावे लागणार आहे तसेच दरवर्षी या शुल्कात 10 टक्‍क्‍यांची वाढ करावी लागणार आहे.

याशिवाय, या प्रकल्पावर 100 टन कचरा प्रक्रिया करता येईल यासाठीची मशिनरी आणि अन्य व्यवस्था आणि त्याचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. या प्रकल्पाच्यासाठी दोन्ही संस्थांकडील संयुक्‍त समिती स्थापन करून त्यांच्यामार्फत मॉनिटरींग केले जाणार असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. या सगळ्याचा सध्याच्या प्राथमिक 7.39 कोटी रुपये खर्च कॅन्टोन्मेंट बोर्डाला देण्याच्या विषयाला महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.