मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: अनिल देशमुख यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली कोविड चाचणी करुन घ्यावी असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 5, 2021
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. अनिल देशमुख यांनी ट्विट करून म्हटले की, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.