नवी दिल्ली – भारतीय सराफात सोन्याचे दर शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी कोसळले. भारत सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 2.5 टक्क्यांनी कमी केले आहे. त्याचबरोबर जागतिक व्यापार सुधारत असल्यामुळे डॉलर वधारत असल्याने सोन्याच्या दरात घट होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
शुक्रवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 163 रुपयांनी कमी होऊन 46,738 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. काही महिन्यापूर्वी सोन्याचे दर 58 हजार रुपयांपर्यंत वाढले होते. शुक्रवारी चांदीचा दर मात्र 530 रुपयांनी वाढून 67,483 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,810 डॉलर व चांदीचे दर 26.71 डॉलर प्रती औस या पातळीवर होते. दिर्घ पल्ल्यातील गुंतवणूकदारांना सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली असल्यास खरेदी योग्य राहील असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते.