वाघोली (पुणे) – भारतीय जनता पार्टी हवेली तालुक्याच्या वतीने करोना काळातील वाढीव वीजबिलाबाबत वाघोली मंडल महावितरण कार्यालयास टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता श्रीखंडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य गणेश बापू कुटे, पुणे जिल्हा व्यापार आघाडीचे अध्यक्ष तथा वाघोली ग्रामपंचायतीचे सदस्य जयप्रकाश सातव, भारतीय जनता पार्टी हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदीप सातव, भाजप युवा मोर्चा हवेली तालुका कार्याध्यक्ष गणेश सातव, ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे, ग्रामपंचायत सदस्य नितीन गावडे, भाजप हवेली तालुकाध्यक्ष क्रीडा आघाडी विजय जाचक, गोरख आबा सातव, अजय कोलते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.