वाघोली (पुणे) – केसनंद (ता. हवेली) गाव येथील ओम, भगवती जोगेश्वरी पॅनलच्या वतीने कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दर्शनासाठी निघलेल्या यात्रेकरूंना कोल्हापूरजवळील किन्हे टोल नाक्यावर बालकांसाठी पल्स पोलिओचा डोस देण्याची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती.
यावेळी शिवसेना हवेली तालुका महिला समन्वय संघटक अलका सोनवणे यांच्या उपस्थितीत 16 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला, याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नितीन गावडे, सुजाता गायकवाड, अक्षदा हरगुडे, अलका गायकवाड, विपुल गायकवाड, श्रीकांत पाटोळे, नितीन गायकवाड, अक्षय गायकवाड, अजित जाधव, शुभम गायकवाड, षिकेश चव्हाण, षिकेश गायकवाड, दशरथ गायकवाड, सतीश गायकवाड उपस्थित होते. यावेळी उन्हामध्ये थांबून आरोग्य सेवक आपली जबाबदारी पार पाडत होते. याप्रसंगी त्यांचे सर्वांचे अलका सोनवणे यांनी मनापासून आभार मानले.