मुंबई – बिग बॉस फेम ‘स्वामी ओम’ यांचं आज (दि. ३) निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वामी ओम यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. बुधवारी रुणालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामी ओम यांचे जवळचे मित्र मुकेश जैन यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते.
दरम्यान, स्वामी ओम बिग बॉस १० मध्ये सहभागी झाली होते. अतिशय वादग्रस्त स्पर्धक म्हणून त्यांच्या कडे पाहिले जात होते. बिग बॉस मध्ये स्वामी आणि व्ही.जे. बानी यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. त्यामुळे त्यांना हा शो सोडावा लागला होता.