मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात उघडकीस आलेल्या ड्रग्ज कनेक्शन एनसीबीने कंबर कसली आहे. आता पर्यंत ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी तपासादरम्यान अनेक नामांकित व्यक्तींची नावे तसेच बॉलीवूडशी संबंध समोर आला आहे.
त्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांना ड्रग्ज पुरवणाऱ्यांमधील काही कलाकारांची देखील एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात आली होती. अशातच मराठी दिग्दर्शक ऋषिकेश पवार याला एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासुन एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र अनेकवेळा नोटीस पाठवून देखील ऋषिकेश चौकशीसाठी गेला नव्हता. यामुळे एनसीबी पथक ऋषिकेश पवार यांच्या घरी गेले होते, यावेळी ते घरी नसल्यामुळे एनसीबीने त्याला फरार म्हणुन घोषीत केलं होते. दरम्यान एनसीबी पथकडून पवार यांना ताब्यात घेतले असून या प्रकरणात पवार यांची चौकशी केली जाणार आहे.