मेष : सध्या वातावरणाची साथ राहील. व्यवसायात अडीअडचणींवर मात करून यश मिळवाल.
वृषभ : महिलांनी खाण्यापिण्याबाबत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे.
मिथुन : व्यवसायात स्वतःच्या मर्यादा ओळखून नवीन योजनांचा विचार करा. पैशाची तजवीज होईल.
कर्क : जिभेचे चोचले पुरवाल. सुवार्ता कळेल. नोकरीत सहज सोपी कामे सोपवली जातील.
सिंह : प्रियजन, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. मनन व चिंतन करावे. महत्वाकांक्षा जागृत होईल.
कन्या : घरात महिलांनी मनावर ताबा ठेवावा. शब्दाने शब्द वाढवू नये. आवडत्या छंदात वेळ घालवावा.
तूळ : पैशाची चिंता मिटेल. प्रकृतीची कुरबूर राहील. तरी वेळीच लक्ष द्या. प्रकृतीकडे लक्ष दया.
वृश्चिक : महिलांना कौटुंबिक सुख मिळेल. आनंदवार्ता कळतील. मानलं तर समाधान मिळेल.
धनु : कामे चोख पूर्ण करा. महिलांनी झेपल तेवढेच काम करावे. विसंबून राहू नये.
मकर : ‘मौनं सवार्थ साधनम्” याचा लाभ होईल. महिलांना सभोवतालच्या व्यक्तिंकडून नवीन अनुभव येतील.
कुंभ : वरिष्ठांची मर्जी तुमचेवर असेल. नवीन ओळखी होतील. महिलांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
मीन : महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. अध्यात्मिक मार्गक्रमण कराल. मनःशांती मिळेल.