आजचे भविष्य (बुधवार, दि.२७ जानेवारी २०२१)

मेष : सध्या वातावरणाची साथ राहील. व्यवसायात अडीअडचणींवर मात करून यश मिळवाल.

वृषभ : महिलांनी खाण्यापिण्याबाबत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे.

मिथुन : व्यवसायात स्वतःच्या मर्यादा ओळखून नवीन योजनांचा विचार करा. पैशाची तजवीज होईल.

कर्क : जिभेचे चोचले पुरवाल. सुवार्ता कळेल. नोकरीत सहज सोपी कामे सोपवली जातील.

सिंह : प्रियजन, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. मनन व चिंतन करावे. महत्वाकांक्षा जागृत होईल.

कन्या : घरात महिलांनी मनावर ताबा ठेवावा. शब्दाने शब्द वाढवू नये. आवडत्या छंदात वेळ घालवावा.

तूळ : पैशाची चिंता मिटेल. प्रकृतीची कुरबूर राहील. तरी वेळीच लक्ष द्या. प्रकृतीकडे लक्ष दया.

वृश्‍चिक : महिलांना कौटुंबिक सुख मिळेल. आनंदवार्ता कळतील. मानलं तर समाधान मिळेल.

धनु : कामे चोख पूर्ण करा. महिलांनी झेपल तेवढेच काम करावे. विसंबून राहू नये.

मकर : ‘मौनं सवार्थ साधनम्‌” याचा लाभ होईल. महिलांना सभोवतालच्या व्यक्‍तिंकडून नवीन अनुभव येतील.

कुंभ : वरिष्ठांची मर्जी तुमचेवर असेल. नवीन ओळखी होतील. महिलांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.

मीन : महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. अध्यात्मिक मार्गक्रमण कराल. मनःशांती मिळेल.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.