कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली ६ वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
हवा येऊ द्या मध्ये हा आठवडा प्रजासत्ताक दिन विशेष आठवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
ह्याच अनुषंगाने ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर ‘IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील, जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम, डॉ. तात्याराव लहाने आणि ग्लोबल पुरस्कारप्राप्त रणजित डिसले गुरुजी’ अश्या दिग्गज मंडळींनी हजेरी लावली.
हे विविध क्षेत्रातील दिग्गज ह्या विशेष भागात आपले अनुभव व्यक्त करताना दिसतील.
तेव्हा पाहायला विसरू नका ‘चला हवा येऊ द्या’ चा प्रजासत्ताक दिन विशेष भाग सोमवार २५ ते बुधवार २७ जानेवारी रात्री ९.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.