“अचानक छातीत दुखू लागलं आणि नाटकाचा प्रयोग करावा लागला रद्द…” सागर कारंडेने केला तब्येतीबाबत खुलासा

Updated On:

मुंबई – ‘चला हवा येऊ द्या’ या मराठी शोमुळे घराघरात पोहचलेल्या अभिनेता सागर कारंडेवर संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो. याचाच प्रत्येय नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे पाहायला मिळाला. एका इन्सिडेंटमुळे सागरच्या तब्येतीबाबत सोशल मिडीयावर अफवा सुरु झाल्या होत्या त्याबाबत स्वतः सागरने फेसबुक लाईव्ह करत नेमकं काय घडलं हे सर्वांसमोर आणलं.

हवा येऊ द्या सोबत सागर एक नाटक देखील करतोय याच नाटकाच्या प्रयोगादरम्यान सागरची तब्येत अचानक बिघडली आणि प्रयोग रद्द करावा लागला. यानंतर सागरच्या तब्येतीबाबत अनेक अफवा सुरु झाल्या होत्या म्हणून सागरने फेसबुक लाईव्ह करत आपली प्रकृती व्यवस्थित असल्याचा खुलासा केला आहे. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अभिनेता सागर कारंडेची तब्येत बिघडली. यामुळे दुसऱ्या नाटकाचा प्रयोग याठिकाणी पार पडला. अचानक छातीत दुखू लागल्याने सागराला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे लागले.

फेसबुक लाइव्हमध्ये काय म्हणाला सागर कारंडे
नाटकाच्या प्रयोगाआधी अचानक माझ्या छातीत दुखू लागलं त्यावेळी मला चक्करही आली २० नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडल्याचे सागराने सांगितले. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व चाचण्या केल्या. डॉक्टरांनी प्रवास न करण्यास सांगितल्यामुळे नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला. यावेळी अनेकांनी फोन करून तब्येतीची चौकशी केली त्या सर्वांचे आभार देखील सागराने या व्हिडिओद्वारे व्यक्त केले आहेत. गेल्या आठवडाभर झालेली धावपळ त्यातच ऍसिडिटी झाल्याने हे सर्व झाले असल्याचे सागर यावेळी सांगतो. तसेच सर्व रिपोर्ट नॉर्मल आले असून अजून एक चाचणी बाकी आहे मात्र तब्येत ठणठणीत असल्याचे सागर कारंडेने यावेळी सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

Sagar Karande : प्रसिद्ध कॉमेडियन सागर कारंडेला लाखोंचा गंडा; आरोपीला अटक

2025-04-17 17:40:39

Sagar Karande : प्रसिद्ध कॉमेडियन सागर कारंडेला लाखोंचा गंडा; आरोपीला अटक

अभिनेता सागर कारंडेची फसवणूक कशी झाली? काय आहे प्रकरण? जाणून घ्या

2025-04-04 22:37:10

अभिनेता सागर कारंडेची फसवणूक कशी झाली? काय आहे प्रकरण? जाणून घ्या

‘आयुष्यात आलेली माणसं वेळ आली की रंग दाखवतात...’, होळीच्या निमित्ताने केलेली कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

2025-03-12 10:52:45

‘आयुष्यात आलेली माणसं वेळ आली की रंग दाखवतात...’, होळीच्या निमित्ताने केलेली कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिकेचा नवा शो येणार भेटीला? फोटोंमुळे चर्चेला उधाण

2025-01-05 10:17:44

श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिकेचा नवा शो येणार भेटीला? फोटोंमुळे चर्चेला उधाण

मनोज वाजपेयी येताच 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर अवतरला भिकू म्हात्रे अन् सुरु झाली धमाल... VIDEO

2023-05-27 11:31:47

मनोज वाजपेयी येताच 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर अवतरला भिकू म्हात्रे अन् सुरु झाली धमाल... VIDEO