“गुलाबो.. जरा इत्र गिरा दो’, लाल रंगाच्या साडीत पूजा सावंत दिसते एकदमच ‘रॉयल’

मुंबई – आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री ‘पूजा सावंत’ने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपले हॉट अँड ट्रॅडिशनल लूक मधील सर्वच फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्स पर्यंत पोहचवत असते.

नुकतंच पूजाने आपल्या इंस्टाग्रामवर काही साडीतील  फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूजा सावंत ने लाल रंगाची साडी घातली असून, ती अतिशय मादक अंदाज दिसून येत आहेत. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.

आपल्या उत्तम अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंतची आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना होते. सध्या ती “महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे. पूजाच्या नृत्यकौशल्यावर प्रेक्षक आधी पासूनच फिदा आहेत आणि आता स्पर्धकांच्या नृत्याचंच ती परीक्षण करणार आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.