कोव्हिड-19 पॉझिटीव्ह रुग्णांना ब्रिटन सरकार देणार 500 पौंड

सरकारच्या प्रस्तावाची फाईल सोशल मिडीयात लीक

लंडन – सध्या करोनाव्हायरसमुळे पसरलेल्या कोव्हिड-19 च्या फैलावामुळे बाधित झालेल्या निवडक नागरिकांनाच, म्हणजे उपचार करणारे डॉक्‍टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाच सरकारकडून निधी दिला जात आहे. मात्र, दहा दिवसांपेक्षा जास्त काळ क्वारंटाईन व्हावे लागलेल्या कोव्हिड-19 पॉझिटीव्ह रुग्णांना सरसकट 500 पौंडांची मदत देण्याचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत ब्रिटन सरकार असल्याचे समजते.

महामारीच्या फैलावामुळे अनेकांना आपला व्यवसाय आणि नोकरीमध्ये नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय आजारी पडल्यास उपचारांचा खर्चही वाढत आहे. अशा स्थितीत नागरिकांना वैद्यकीय उपचारांचा भुर्दंड बसू नये, यासाठी ही मदत जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

याबाबतचा प्रस्ताव ब्रिटन सरकारच्या विचाराधिन असल्याबाबतची कागदपत्रे सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाल्यानंतर सरकारच्या योजनेविषयी माहिती लोकांना मिळाली आहे. काही जणांनी या प्रस्तावाचे स्वागत केले असून काही जणांनी 500 पौंड ही रक्कमच तुटपुंजी असल्याचे म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.