चहा आवडत नाही, अशी व्यक्ती सापडणे कठीणच. आपल्यापैकी बहुतेक लोकांना चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते. बऱ्याचजणांना याचे चक्क व्यसनच असते. दररोज घरात बनवल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी चहा हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पण काही लोकांना चहासोबत काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छाही असते.
जसे, रिकाम्या पोटी नुसता चहा प्यायल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते, तसेच आपण चहासोबत खात असलेल्या चुकीच्या पदार्थांमुळेदेखील शरीराला नुकसानही पोहचत असते. काही पदार्थांमुळे कदाचित दवाखान्याची पायरी चढावी लागू शकते. चहासोबत सेवन केल्याने शरीराला हानी होऊ शकते, अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया.
-
चहा पिताना आपण कोणत्या प्रकारचे चहा घेत आहात, हे लक्षात घ्या. जर आपण ‘ग्रीन टी’ सेवन करत असाल तर, त्यासोबत दुसरे काहीही खाऊ नका. त्याच वेळी, जर तुम्ही दुधाचा चहा घेत असाल तर, एक किंवा दोन बिस्किटे नक्की खाऊ शकता.
-
चहा प्यायल्यानंतर लगेच अशा गोष्टी खाऊ नयेत, ज्यात हळदीचे प्रमाण जास्त असेल. कारण, चहा आणि हळदीमधील रासायनिक घटक एकमेकांशी मेळ साधून आपल्या पचन तंत्राला बरेच नुकसान करतात आणि पोटास हानी पोहोचवू शकणारे घटक तयार करतात.
-
अनेक लोक चहासोबत बेसन पीठात बनवलेले, तळलेले पदार्थ खातात. चहाबरोबर बेसनयुक्त पदार्थांचे सेवन करणे अतिशय धोकादायक आहे. यामुळे आपली पचनशक्ती कमकुवत होते. याशिवाय शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते.
-
आपल्यापैकी बरेचजण चहाची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबू किंवा लिंबाचा रस मिसळतात. परंतु, हे मिश्रण आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. त्याचप्रमाणे चहासह अंडी, ऑमलेट खाणे बर्याच लोकांना आवडते. हे देखील आपल्या आरोग्यास हळूहळू हानी पोहोचवू शकते.
-
चहा प्यायल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. आपल्या घरातील वडीलधारी मंडळीही आपल्याला असे करण्यास प्रतिबंध करतात. कारण चहा पिल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे आपल्या पोटात अनेक समस्या उद्भवतात. तसेच चहा घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.