भारती विद्यापीठ पोलिसांकडून 17 किलो अफु जप्त; होंडा सिटी कार चालकास अटक

पुणे – भारती विद्यापीठ पोलिसांनी एका होंडा सिटी कार चालकास अटक करुन 17 किलो 200 ग्रॅम अफु हा अंमलीपदार्थ जप्त केला. त्याच्याविरुध्द एनडीपीएस कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिपाल गणपत विष्णोई (30,रा.हरपळे वस्ती, फुरसुंगी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील पोलीस नाईक वणवे व पोलीस शिपाई पांढरे यांना कात्रज चौकात एक एक संशयास्पद होंडा सिटी कार अडवली. त्यांनी गाडीच्या डिकीची तपासणी केली असता, त्यांना डिक्कीमध्ये अफुची बोंडे व पाने आढळली. त्यांनी तातडीने याची खबर भारती विद्यापीठ पोलिसांना दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे, रविंद्र भोसले, संतोष भापकर, निलेश खोमणे, सोमनाथ सुतार, समिर बागशिराज, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, राहूल तांबे, सर्फराज देशमुख सचिन पवार व विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

गुन्हे शाखेकडू एलएसडी हस्तगत

अमंली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना तीघांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एलएसडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुध्द वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकेश सोहनलाल चौधरी ( 19, रा.तुकाराम कमान, शास्त्रीनगर कोथरूड) , शुभम विलास काशाळे ( 23 रा 395 दुर्वांकुर हॉटेल समोर स्वरांजली अपार्टमेंट टिळक रोड ), यशवंत चारुदत्त सोनवणे (20 रा 61 सदाशिव पेठ) अशी आरोपींची नावे आहेत.

हे तीघेही वारजे माळवाडीतील काकडे सीटीजवळ एलएसडी हा अमली पदार्थ अवैधरित्या बाळगून विक्री करताना सापडले. त्यांना सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे एलएसडी हा अमली पदार्थ 380 मिली ग्राम (किमत 40,000) व त्यांच्याकडील मोबाईल एकूण किमत 40,000/-रु असा एकूण 80,000/-रु चा मुद्देमाल मिळून आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.