रत्नागिरी : दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे आमदार विनायक राऊत यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांना आता माजी खासदार निलेश राणेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.
शिवसेनेचे अनेक नेते नारायण राणे मंत्री असताना उद्धव ठाकरे यांची कामे घेवून भेटायला यायचे. बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात सुद्धा नारायण राणेंना फोन केल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणेंनी केला आहे.
विन्या राऊत मीटर चोर तुझ्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणेंचं काहीही बिघडू शकत नाही. तुझी लायकी मातोश्रीचे बिस्कीट चोरायच्या पलीकडे नाही. बेवडा मुलगा निस्तरता येत नाही म्हणून दुसऱ्याना बोलून काही बदलणार नाही. जनतेने काम करायला निवडून दिले आहे, राणेंवर टीका करायला नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 11, 2021
मिलिंद नार्वेकरांपासून एकनाथ शिंदेपर्यंत सर्व शिवसेनेचे नते भेटायला यायचे, याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. जे आता मंत्री आहेत, राणे साहेबांकडे ते उद्धव ठाकरेंची किती कामे घेवून यायचे, त्याची माहिती आमच्याकडे सुद्धा आहेत. बंद खोलीत कुणाला फोन करायची गरज नसल्यामुळे विनायक राऊतांनी उड्या मारु नयेत. आम्ही स्वयंभू असल्यामुळे आम्हाला ठाकरे सरकारची गरज नसल्याचा घणाघात निलेश राणेंनी केला.
विनायक राऊत यांना चांगले ते दिसत नाही. मेडिकल कॉलेजची परवानगी मिळते. मेडिकल काऊंसील ऑफ इंडियाकडून परवानगी येते. आम्ही मेडिकल कॉलेलच्या जमीनसाठी प्रायव्हेट कर्ज घेतले असून त्यावर हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेज परवानगीसाठी राज्य सरकारची गरज नसल्यामुळे शिवसेनेचा पोटात का दुखत असल्याची बोचरी टीका निलेश राणेंनी केली.