पुणे – कमी प्रतीचे प्लायवूड वापरले म्हणून इंटेरिअर डिझाइनर व सुतारावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 52 लाख 31 हजारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी एका 70 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांच्या मुलाच्या भुगाव येथील बंगल्याचे फॉल सिलिंग, फर्निचर, प्लंबिंग, सिव्हिल वर्क, इलेक्ट्रीकल, लिफ्ट बसवणे अशी कामे देबश्री घटक (पाषाण), कन्हैयालाल सुतार (रा. आंबेगाव) यांना दिली होती.
त्यांना बंगल्याच्या कामासाठी हाय क्वालिटी वॉटर प्रूफ मरीनप्लाय वापरण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी मरीनप्लाय न वापरता कमी प्रतीचे मटेरीयल वापरले.
फिर्यादी यांच्या मुलाची 52 लाखांची फसवणूक करून विश्वासघात केला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश माळी करत आहेत.