परळी – तालुक्यातील वैजवाडी गावातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. याबाबत मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटररून माहिती दिली आहे.
‘परळी या माझ्या मतदारसंघात नेहमीप्रमाणे आजही 5 तास जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला, त्यांच्या अडी-अडचणी, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील वैजवाडी येथील अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रस पक्षात यावेळी प्रवेश केला. सर्वांचे स्वागत.’ असे ट्विट मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
परळी या माझ्या मतदारसंघात नेहमीप्रमाणे आजही 5 तास जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला, त्यांच्या अडी-अडचणी, प्रश्न सोडवण्याचा प्रयन्त केला. तालुक्यातील वैजवाडी येथील अनेक भाजपा कार्यकर्त्यांचा @NCPspeaks पक्षात यावेळी प्रवेश केला. सर्वांचे स्वागत. pic.twitter.com/BRRNYZWFre
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 10, 2021
यावेळी 25 वर्षांपासून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी उपसरपंच लिंबाजी भांगे, ग्रा.पं. सदस्य नारायण भांगे, युवा भाजप कार्यकर्ते शत्रुघ्न भांगे, अनिल मोगले, बिभीषण मोगले, अशोक मोगले, गणेश गडदे, ज्ञानदेव मुंडे, सतिश सानप, अंकुश कळसाईतकर, प्रकाश सानप, केदारी सानप, गिरीराज सानप, लक्ष्मण भांगे, बालाजी भांगे, ज्ञानदेव डोंगरे, रामभाऊ आंधळे, नितीन सानप, बाळू आंधळे, नागनाथ चव्हाण, बालाजी भांगे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रेवश केला.