नवी दिल्ली : करोनाच्या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा जगाला धडकी भरवली आहे. त्यात देशातही या नव्या स्ट्रेनची एन्ट्री झाली आहे. तसेच याची संख्या आता ९६ वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.
ब्रिटनमधून आलेल्या नव्या करोनाच्या स्ट्रेनने एकच खळबळ उडवली आहे. भारतात या नव्या विषाणूच्या संक्रमितांची संख्या १०० वर पोहोचणार आहे. दरम्यान, नुकताच मुंबईतील तीन रुग्णांमध्ये अशा प्रकारचा विषाणू आढळून आला आहे, ज्यावर अँटिबॉडीजचाही परिणाम होत नसल्याचं एका रिपोर्टमधून समोर आले आहे.
The total number of persons found infected with the mutant UK strain of COVID-19 is 96: Health Ministry
— ANI (@ANI) January 11, 2021
टाटा मेमोरियल सेंटरचे होमियोपॅथी विभागाचे प्रा. डॉक्टर निखिल पटकर यांच्या माहितीनुसार, त्यांच्या टीमने ७०० कोविड-१९ नमुन्यांच्या जिनोमच्या सिक्वेंसिंगच्या माध्यमातून पडताळणी केली होती. यांपैकी तीन नमुन्यांमध्ये E484K म्यूटेंट मिळाला आहे.
कोविडचा हा म्यूटेंट मिळणे यासाठी चिंताजनक आहे कारण जुन्या विषाणूमुळे शरिरात प्रतिरोधक क्षमतेमुळं तयार झालेली तीन अँटिबॉडी यावर प्रभावहीन असल्याचं त्यांनी सांगितल्याचे एका संकेतस्थळाने म्हटले आहे.