मेष : कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. पैशाची चिंता मिटेल. घरात व संसारिक जीवनात वादविवाद टाळा.
वृषभ : नियमांचे उल्लंघन होणार नाही. याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. डोके शांत ठेवून धीर धरणे उत्तम.
मिथुन : जादा भांडवलाची गरज भासेल. महिलांनी रागांवर नियंत्रण ठेवावे. घरात अनेक बेत ठरतील.
कर्क :फसव्या गोड बोलण्यापासून सावध रहावे. “”आपले काम बरे की आपण बरे” हे धोरण चांगले.
सिंह : सुखशांती लाभेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांशी सुसंवाद साधता आल्याने मतभेद दूर करता येतील.
कन्या : कंटाळवाण्या कामातून सुटका झाल्याने हायसे वाटेल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश येईल.
तूळ : महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तेव्हा तुमचा दृष्टिकोन सावध ठेवा. कामात निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या.
वृश्चिक : पैसे मिळाल्याने कामाचा आनंद मिळेल. नोकरीत बदल पाहिजे असल्यास शब्द वरिष्ठांकडे टाका.
धनु : एखादी आनंदवार्ता मन प्रसन्न करेल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. खरेदी होईल.
मकर : ग्रहांची अनुकूलता तुम्हाला कार्यरत ठेवेल. घरात जुने प्रश्न निकालात लागतील.
कुंभ : वातावरण आनंदी राहील. व्यवसायात पूर्वी ज्या व्यक्तींनी विरोध केला होता त्यांच्याकडून सामंजस्याची भाषा ऐकू येईल.
मीन : वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत कामात मिळेल. पैशाची कुवत ओळखून इतर व्यक्तींना आश्वासन दया.