एक्ट्रेस नोरा फतेहीने सैफ आणि करीना यांचा मुलगा तैमुर अली खान बरोबर लग्न करायची इच्छा व्यक्त केली आहे. एका चॅट शो मध्ये बोलताना तिने ही इच्छा व्यक्त केली. करीना कपूरने मात्र नोराला लगेच थांबवले. तैमुर आता केवळ चार वर्षांचा आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाचा कोणताही विचार नसल्याचे करीनाने तिला सांगितले.
View this post on Instagram
त्यावर आपण वाट बघायला तयार असल्याचे नोरा म्हणाली. तैमूरचा जन्म झाल्यापासून त्याचे फोटो फिल्मी मॅगझीन आणि वेबसाईटवर व्हायरल होत आहेत. त्याच्या फोटोंना भरपूर लाईक मिळत आहेत. “सेलिब्रिटी कीड’ असल्याने तैमूरला नेहमीच फोटोग्राफरचा गराडा पडलेला असतो.
View this post on Instagram
अलिकडे तो या फोटोग्राफरला कंटाळाला आहे आणि त्याने फोटोग्राफर्सना पोज द्यायलाही नकार दिला होता. त्याच्या ग्लॅमरस लुकवर सैफ आणि करीनाचे फॅन जसे फिदा झाले आहेत, तसेच नोरा फतेही देखील फिदा झाली आहे. करिनाकडे आता दुसरी “गुड न्यूज’ आहे आणि लवकरच तैमूरला मोठा भाऊ म्हणणारे कोणीतरी येणार आहे. सध्या नोरा फतेही “द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमाच्या रिलीजची तयारी करत आहे.