वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त बैठकीने आज ज्यो बायडेन यांना इलेक्टोरल कॉलेज मतांच्या आधारे विजयी झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले. 3 नोव्हेंबरला झालेल्या निवडणूकीतील निकालानुसार ज्यो बायडेन हे अमेरिकेचे भावी अध्यक्ष आणि कमला हॅरिस या भावी उपाध्यक्षा असतील, असे आज संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले.
गुरुवारी पहाटेच्या सुमारास संयुक्त बैठकीमध्ये या निवडीबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. बुधवारी रात्री ट्रम्प यांच्या शेकडो समर्थकांनी कॅपिटोल हिलवर जोरदार हिंसाचार घडवून आणल्यानंतर संयुक्त बैठकीचे कामकाज काही काळासाठी स्थगित केले गेले होते. मात्र परिस्थिती सुरळीत झाल्यावर बैठकीचे कामकाज पुन्हा सुरू झाले होते.
ट्रम्प यांनी संयुक्त बैठकीच्या निर्णयाला स्वीकारल्यासारखे मत व्यक्त केले. संयुक्त बैठकीचा हा निर्णय आपल्या पहिल्या अध्यक्षीय कारकिर्दीचा अखेर असल्याचेच दर्शवते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.