Video: अजब प्रेमाची गजब कहानी! एकाच मांडवात वराने दोन वधुंसोबत बांधली ‘लग्नगाठ’

रायपूर – आतापर्यंत तुम्ही एक वर आणि एक वधू यांचा विवाह पाहिला असेल. मात्र छत्तीसगडमधील जगदरपूर येथे एका मुलाने दोन मुलींसोबत एकाच मांडवात लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाचे नाव चंदू तर सुंदरी आणि हसीना असे त्याच्या दोन्ही पत्नीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदू हा शेतकरी आहे. एका वर्षापूर्वी तो सुंदरीच्या प्रेमात पडला. त्याने तीला आपल्या घरी देखील आणले. त्यातच काही महिन्यानंतर चंदूला हसीनावर प्रेम झालं. त्याने तिलाही घरी आणले. त्यानंतर तिघेही गुण्यागोविंदाने एकत्र राहू लागले.

जवळपास एक वर्षभर सोबत राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. चंदू आणि दोन्ही मुलींच्या घरच्यांनी देखील या लग्नाला संमती दिली. वर्षभर एकत्र राहूनही तिघांमध्ये कसलाच वाद झाला नसल्याने गावकरी देखील आश्चर्यचकित झाले आहे.

दरम्यान, 3 जानेवारी 2021 रोजी चंदूचा सुंदरी आणि हसीनाशी विवाह पार पडला. या विवाह सोहळ्याला तब्बल 600 लोक उपस्थित होते. एका नेटकऱ्याने यासंदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून नेटकऱ्यांनीही याला पसंती दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.