गुड न्यूज : 1 कोटी भारतीयांची करोनावर मात

नवी दिल्ली – कोविडविरुद्धच्या लढाईत भारताने आज महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. कोविडमुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येने 1 कोटीचा आकडा ओलांडला. भारतातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. गेल्या 24 तासांत 19,587 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आता वाढून 96 टक्के झाला. देशातील एकूण बाधितांची संख्या आज 2 लाख 28 हजार आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी 51 टक्के रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ अशा पाच राज्यांत केंद्रित आहेत. 

रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 96 टक्‍के आहे. त्याचबरोबर सर्व राज्यांमधील रुग्ण बरे होण्याचा दर देखील 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वाधिक आहे. बाधित रुग्णांची अधिक संख्या असलेल्या देशांचा रुग्ण बरे होण्याचा दर भारताच्या तुलनेत कमी आहे.

केरळमध्ये काल एका दिवसात सर्वाधिक 5,110 रुग्ण बरे झाले असून त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 2,570 रुग्ण बरे झाले आहेत. नवीन बाधित रुग्णांपैकी 83 टक्‍के रुग्ण 10 राज्यांमधील आहेत. 

गेल्या 24 तासांत 222 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी 67.57% हे सहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात काल एकाच दिवसात सर्वाधिक 66 मृत्यूची नोंद झाली. केरळमध्ये 25 तर पश्‍चिम बंगालमध्ये 22 नवीन मृत्यूची नोंद झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.