नवी दिल्ली – इंग्लंडमधील कथित एक कोटी 20 लाख रुपयांच्या बेनामी मालमत्ता प्रकरणी आयकर विभागाने रॉबर्ट वढेरा यांच्या निवासस्थानी जाऊन जबाब घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वढेरा हे कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती आहेत. लंडनमध्ये त्यांच्या मालकीचा एक कोटी 20 लाख पाऊंडस् किंमतीची मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तीकर खात्याकडे असल्याचे सांगण्यात येते. त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी ही चौकशी करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.
आयकर विभागाशिवाय वढेरा यांची मनी लॉंड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचनालायाकडून चौकशी सुरू आहे. लंडन येथील 12 ब्रायनस्टोन स्वेअर ही मालमत्ता वढेरा यांनी विकत घेतल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी करण्यात आली होती त्यात ते जामीनावर बाहेर आहेत.
पोलिसांनी वढेरा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्या विरोधात गुडगाव येथील मालमत्ता खरेदीच्या प्रकरणातील अनियमितेबद्दल गुन्हा नोंदवला आहे.