मुंबई – ‘मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियॉट- बॅकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज’ नावाच्या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात उपस्थित एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचावर प्रश्न विचारत टीका केली आहे.
Will Bhagwat answer: What about Gandhi’s killer Godse? What about the men responsible for Nellie massacre, anti-1984 anti-Sikh & 2002 Gujarat pogroms?
It’s rational to assume that most INDIANS are patriots regardless of their faith. It’s only in RSS’s ignorant ideology….[1/2] https://t.co/fZv3GpmlIg
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) January 1, 2021
असुदुद्दीन ओवेसी म्हणाले की,’गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेबद्दल काय? नेल्ली येथे झालेल्या हत्याकांडाबाबत, तसंच १९८४ मधील शीख विरोध आणि २०२० मधील घटनेबद्दल काय विचार आहेत?,” असा खोचक प्रश्न ओवेसी यांनी मोहन भागवत यांना केले आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारले.
तत्पूर्वी,माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते. मी माझा धर्म समजूनच एक चांगला देशभक्त बनेन आणि लोकांनाही असेच करायला सांगेन. एवढंच नाही, तर स्वराज्य समजून घ्यायचे असेल, तर स्वधर्माला समजून घ्यावे लागेल असं महात्मा गांधी म्हणाले होते,” असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवत यांनी केलं होतं. त्यांच्या याच विधानावर आता असुदुद्दीन ओवेसी यांनी गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेबद्दल काय? असा खोचक प्रश्न विचारला आहे.