मुंबई – शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ असा केल्याने, भाजप आमदार अतूल भातखळकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.
‘शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल भातखळकर यांनी केला.
शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही. pic.twitter.com/9tXVkq3I8i
— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) December 31, 2020
कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर २०२१ असे लिहिले आहे. कॅलेंडरच्या वरच्या दोन कोपऱ्यांमध्ये शिवसेना आणि युवासेना असेही नमूद करण्यात आले आहे. हे कॅलेंडर मराठी, इंग्रजी या भाषेसोबतच उर्दू भाषेतही आहे. कॅलेंडरवर इंग्रजी महिन्यांच्या शेजारी इस्लामिक महिना आणि इतर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
याच कॅलेंडरचा फोटो पोस्ट करत, शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही…. @OfficeofUT pic.twitter.com/HPbspXSq5Y
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 31, 2020
दरम्यान, करोनाकाळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची (प्रमाणपत्राची) गरज नाही’, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरुंग सकपाळ यांनी अजान स्पर्धा आयोजित केल्याने विरोधकांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर काही दिवसांतच सकपाळ यांनी अजान स्पर्धेशी आपला संबंध नसल्याचा खुलासा केला होता.