नवी दिल्ली – गेल्या आठ महिन्यांपासून पायाभूत क्षेत्राची उत्पादकता नकारात्मक पातळीवर होती. आता नोव्हेंबर महिन्यातही उत्पादक या क्षेत्रची उत्पादकता उणे 2.6 टक्के इतकी नोंदली गेली आहे.
नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण, पोलाद आणि सिमेंट क्षेत्राची उत्पादकता वाढलेले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये या क्षेत्राची उत्पादकता 0.7 टक्क्यांनी वाढली होती. या नोव्हेंबर महिन्यात कोळसा उत्पादन, खत, वीज उत्पादन वगळता इतर क्षेत्रांची उत्पादकता कमी झाली आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत पायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 11.4 टक्के इतकी नोंदली गेली आहे. गेल्या वर्षी या कालखंडात या क्षेत्राची उत्पादकता 0.3 टक्क्यांनी वाढली होती.
पायाभूत क्षेत्रातील उद्योगांचा एकूण औद्योगिक उत्पादनातील वाटा 40.27 टक्के आहे. या क्षेत्राची उत्पादकता वाढावी याकरिता केंद्र सरकार आणि रिव्हर्व्ह बॅंक भांडवल सुलभता पातळीवर बऱ्याच महिन्यांपासून प्रयत्न करीत आहे.