पुणे – दिवसभरात शहरात 282 करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 78 हजार 540 झाली आहे. तर, आजारातून बरे झालेल्यांची संख्या 1 लाख 70 हजार 400 झाली आहे.
ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 3,514 असून, ही संख्या कमी झाली आहे ही सकारात्मक गोष्ट आहे. ऍक्टिव्ह रुग्णांमधील 242 रुग्ण अत्यवस्थ असून त्यामध्ये 145 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
गेल्या चोविस तासांत 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील दोघे पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4,626 जणांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी केलेल्या 4,023 स्वॅबटेस्टसह शहरात आजपर्यंत एकूण 9 लाख 9 हजार 353 टेस्ट झाल्या आहेत.