आजचे भविष्य (गुरुवार, दि. ३१ डिसेंबर २०२०)

मेष : घरात प्रतिष्ठा वाढवणारी खरेदी होईल. महिलांना अध्यात्मिक प्रगती साधता येईल.

वृषभ : कलाकार खेळाडूंना स्वतःचे वेगळेपण सिद्ध करून दाखवता येईल. तरुणांना जीवनसाथी भेटेल.

मिथुन : जोडधंदा असणाऱ्यांनी आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्यावा मगच कृती करावी. शुभकार्य ठरेल.

कर्क : कुटुंबासमवेत वातावरणाचा आस्वाद घ्याल. आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत याची दक्षता घ्या.

सिंह : आपलेच म्हणणे खरे करू नका. अनावश्‍यक खर्चांना वेळीच आळा घाला. तरुणांनी धाडस करू नये.

कन्या : पैशावरून किरकोळ वाद होतील. प्रकृतीची काळजी घेऊन काम केलेत तर कामाचा दर्जा चांगला राहील.

तूळ : खर्चाचे प्रमाण वाढले तरी कोणालाही फिकीर नसेल. महिलांनी घरकाम व छंद जोपासून आनंद घ्यावा.

वृश्‍चिक : पैशाची चिंता मिटेल. कलाकारांना नेत्रदिपक कामगिरी करून दाखवता येईल. महिलांचे ईप्सित साध्य होईल.

धनु : प्रकृतीमान सुधारेल मात्र अतिचिंता करू नका. उसने अवसान आणून वेळ मारून न्यावी लागेल.

मकर : वातावरण आनंदी असेल. कलाकार,खेळाडूना मनपसंत काम मिळेल. सहकारी कामात मदत करतील.

कुंभ : घरात दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्यात धन्य मानाल नेहेमीपेक्षा वेगळ्या गोष्टींसाठी आकर्षण वाटेल.

मीन : तरुणांनी भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. घरात सर्वांचे विचार जमणे जरा दुरापास्त होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.