पुणे – पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन वैजनाथ पारीश्वाड (वय 60) यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. हि घटना सोमवारी रात्री 10 वाजता औंध येथे घडली. परीथवाड यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.
पारीश्वाड हे औंधमधील नागरस रोडवरील हर्ष पैराडाईज या सोसायटीमध्ये राहात होते. त्यांनी सोमवारी रात्री 10 वाजता इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली. त्यावेळी तेथील सुरक्षारक्षकाने ही घटना पाहिली. त्याने याबाबत तत्काळ सोसायटीतील नागरीकांना याविषयी माहिती दिली. सोसायटीमध्येच असलेल्या एका डॉक्टरने त्यांची तपासणी केली, मात्र त्यांना गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पडले होते. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला. परीथवाड यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहुन ठेवली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले.