मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस बजावल्याने चांगलेच संतापले आहेत. कारण त्यांनी ईडी तसेच भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. त्यातच संजय राऊत यांनी ईडीसमोर हजर होण्यासाठी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहिती दिली आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे.
ईडीने नोटीस पाठवल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी एक शायरी ट्विट केली आहे. “मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्याचा तुम्ही प्रयत्न झाला, तेव्हा मी उभारी घेतली आहे” असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
तुम लाख कोशिश करलो
मुझे बदनाम करने की
मैं जब भी बिखरा हूँ
दुगनी रफ्तार से निखरा हूँ…— Sanjay Raut (@rautsanjay61) December 29, 2020
संजय राऊत यांनी सोमवारी धमकावलंही जातं असून मी कुणालाही घाबरत नाही. मी या सगळ्यांचा बाप आहे असं म्हटलं होतं. यासंबंध बोलताना ते म्हणाले की, “मला धमकी देणारा अद्याप जन्माला आलेला नाही. सरकार पाडण्यासाठी काही करु असं सांगितलं होतं, त्याला मी धमकी मानतो. जो मला धमकी देईल तो राहणार नाही”,असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.