हॅमिल्टन – न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने फॉलोऑनची नामुष्की टाळली. न्यूझीलंडच्या 431 धावांसमोर आज तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 239 धावा केल्या.
न्यूझीलंडने 192 धावांची भक्कम आघाडी घेतली असून सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी असल्याने या सामन्यासह मालिकेत आघाडी घेण्याची त्यांना संधी मिळाली आहे.
रविवारच्या 1 बाद 30 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. एकवेळ 6 बाद 80 अशा दयनिय स्थितीतून फहिम अश्रफ व महंमद रिझवान यांनी भक्कम फलंदाजी करत सुस्थिती प्राप्त करून दिली. मात्र, रिझवान धावबाद झाला तसेच अश्रफ शतकाच्या जवळ आलेला असताना बाद झाल्याने त्यांचा डाव 239 धावावंर संपुष्टात आला.
अर्थात त्यांनी फॉलोऑनची नामुष्की टाळण्यात यश मिळवले. आता मंगळवारी यजमान संघ आपला दुसरा डाव सुरू केल्यावर आघाडी किती वाढवतो हे महत्त्वाचे ठरणार असून यजमान संघाला विजयासह मालिकेत आघाडी घेण्याची नामी संधी मिळाली आहे.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड पहिला डाव – सर्वबाद 431. पाकिस्तान पहिला डाव – 102.2 षटकांत सर्वबाद 239 धावा. (अबीद अली 25, फहिम अश्रफ 91, महंमद रिझवान 71, काएल जेमिसन 3-35, नेल वॅगनर 2-50, टीम साऊदी 2-69, ट्रेन्ट बोल्ट 2-71).