पुणे – दिवसभरात 148 करोनाबाधितांची वाढ झाली असून, यांचा समावेश करून 1 लाख 78 हजार 20 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यातील 1 लाख 69 हजार 571 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सोमवारी डिस्चार्ज मिळालेल्या 409 जणांचा समावेश आहे.
शहरातील रुग्णालयांमध्ये 333 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातेल 207 व्हेंटिलेटरवर आहेत. तर, 3,832 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील तीन पुण्याच्याबाहेरील आहेत. यांच्या आकडेवारीसह करोनाने मृत्यू पावलेल्यांची संख्या आता 4,617 झाली आहे.
महापालिका हद्दीत आतापर्यंत केलेल्या स्वॅबटेस्टने नऊ लाखांचा आकडा पार केला असून, 9 लाख 6 हजार 973 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. सोमवारी दिवसभरात 2,284 टेस्ट झाल्या.