दुबई – न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 सामन्यांची मालिका संपल्यानंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आठव्या स्थानावरून सातव्या स्थानावर आला आहे.
याव्यतिरिक्त पाकिस्तानविरुद्ध तिन्ही सामन्यात धडाकेबाज खेळी करणाऱ्या न्यूझीलंडच्या टीम सेफर्टच्या क्रमवारीत चांगलीच सुधारणा झाली असून त्याच्या क्रमवारीत 24 स्थानांनी सुधारणा झाली आहे. सेफर्ट सध्या नवव्या स्थानावर आहे.
तसेच भारताच्या लोकेश राहुलनेही आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या एकाही गोलंदाजाला स्थान मिळालेले नाही.