मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र व गोव्यातील जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, दया व करुणेने परिपूर्ण भरलेल्या जीवनाचे स्मरण देतो. येशू ख्रिस्तांनी मानवतेच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. नाताळचा पवित्र सण सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेवून येवो, अशी मी प्रार्थना करतो.
राज्यपाल @BSKoshyari यांनी #नाताळ निमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा. भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, दया व करुणेने परिपूर्ण भरलेल्या जीवनाचे या सणातून स्मरण. येशू ख्रिस्तांनी मानवतेच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो. pic.twitter.com/yW79Pa3jw9
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 24, 2020
सर्वांना नाताळ तसेच आगामी वर्ष २०२१ निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.