पुणे : पुण्यात कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीत आज (बुधवार) सकाळी रानगवा (Indian Gaur) दिसून आला आहे. रानगवा दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर रानगवाला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले आहे
नागरिकांनी तातडीनं वनविभाग आणि पोलिसांना कळविले आहे. वनखात्याची टीम ट्रँक्विलायझर घेऊन तिथे पोहोचली. पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर रानगवाला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले आहे.
या पाच तासांमध्ये रानगवाने कोथरूड परिसरातील महात्मा सोसायटी, इंदिरा शंकर नागरी परिसर फिरला. यावेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.