मेष : विरोधकांवर मात कराल. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत स्वास्थ्य मिळेल. पैशाची चिंता मिटेल.
वृषभ : खर्चावर मात्र बंधन ठेवावे लागेल. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. चिकाटी, योग्य संगत ठेवा.
मिथुन : आत्मविश्वासाने नवीन कामे हाती घ्याल. प्रगती होईल. कर्तृत्वाला संधी मिळेल. जिद्द वाढेल.
कर्क : परिश्रमाने हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. व्यवसाय व नोकरीत विशेष लक्ष द्यावे लागेल.
सिंह : हितशत्रूंवर मात कराल. प्रतिष्ठा मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल. पैशाची ऊब मिळेल.
कन्या : प्रगतीची वाटचाल चढती कमान राहील. उत्साही असाल. कामाचा ताण व दगदग धावपळ वाढेल.
तूळ : मनोकामना प्रत्यक्षात साकार होतील. कामात अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.
वृश्चिक : योग्य दिशा सापडेल. प्रवासयोग येतील. मनोबल उंचावेल. कामाची जबाबदारी यशस्वीपणे पेलाल.
धनु : वैवाहिक सौख्य लाभेल. पाहुण्यांची ये-जा राहील. मानसिक समाधान मिळेल. मुलांकडून सुवार्ता कळेल.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. दगदग धावपळ जास्त होईल.मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल.
कुंभ : नको त्या कामात वेळ जाईल. पैशांची थोडी चणचण जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मीन : महत्त्वाची बातमी कळेल. अनपेक्षित कामे होतील. आनंददायक दिवस. आप्तेष्टांचा सहवास.