नवी दिल्ली – आयसीआयसीआय बॅंकेच्या प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या चंदा कोचर यांनी आपल्यावरील कारवाईच्या विरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. पण त्यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला असून त्यांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.
चंदा कोचर या आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून कार्यरत होत्या. पण त्यांच्यावर तेथे गैरप्रकार केल्याचा आरोप झाल्यानंतर बॅंकेने त्यांना या पदावरून दूर केले. बॅंकेच्या या निर्णयाच्या विरोधात कोचर हायकोर्टात गेल्या होत्या.
पण हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावल्यानंतर त्या निर्णयाच्या विरोधात त्या सुप्रिम कोर्टात गेल्या होत्या. पण त्यांची तेथील याचिकाहीं सुप्रिम कोर्टाने आज फेटाळून लावली.