अभिषेक बच्चन सध्या कोलकातामध्ये “बॉब बिस्वास’चे शुटिंग करतो आहे. या सिनेमासाठी त्याचा लुक अगदी अफलातून बदलला गेला आहे. चित्रांगदा सिंह बरोबरचे त्याचे या लुकमधील फोटो व्हायरल झाल्यावर तो अभिषेकच आहे, हे अजिबात ओळखू येत नाही. निळा शर्ट, डार्क पॅन्टमधील अभिषेकची हेअर स्टाईल अगदी बंगाली बाबूला शोभेल अशी आहे.
त्याच्या डोळ्यावर मोठा चष्माही आहे. नेहमी ताठ चालणारा अभिषेक थोडे वाकून चालताना दिसतो आहे. त्याचे पोटदेखील थोडे वाढलेले दिसते आहे. बंगाली साडी नेसलेली चित्रांगदा त्याच्याबरोबर चालते अहे आणि त्यांच्याबरोबर एक लहान मुलगाही आहे. “बॉब बिस्वास’ च्या शुटिंगला सुरुवात झाली तेंव्हा लॉकडाऊन थोडाच शिथिल केला गेला होता. त्यामुळे फारच थोड्या सहकाऱ्यांसह शुटिंग सुरू केले गेले.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चनने इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये आपण शुटिंगला सुरुवात केले असल्याचे म्हटले होते. “घरीच रहा, सुरक्षित रहा, मास्क घाला’ अशी सूचनाही त्याने आपल्या फॅन्सला केली होती. “बॉब बिस्वास’ची निर्मिती शाहरुखच्या “रेड चिली एन्टरटेनमेंट’द्वारे केली जात आहे. ही एक क्राईम थ्रिलर स्टोरी असणार आहे.
View this post on Instagram